Virar Politics  Saam tv
महाराष्ट्र

Virar Politics : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; बविआ आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा

Virar Political News : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Vishal Gangurde

विरार : बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सह सहा जणांवर तुळींज पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. विवांत हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

आज मंगळवारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदेश चौधरी असं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचं आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवांता हॉटेल आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

सुदेश चौधरी यांच्या तक्रारीनंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात ला आहे. सुदेश चौधरी हे शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख आहेत. मारहाण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे या प्रकरणी चौथा गुन्हा क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात दाखल झाला आहे.

नाशिकमध्ये हॉटेलमध्ये पावणे दोन कोटींची रोकड जप्त

नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या कारवाईत तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. हॉटेलमधील ही रोकड शिंदेंच्या शिवसेना उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या निवडणुकीसाठी आणण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी केलाय.

शिवसेनेच्या नेत्यांनी हा पैसा पुरवल्याचा गंभीर आरोप देखील आहिरे यांनी मित्र पक्षावर केला आहे. मात्र, पराभवाच्या भीतीतून केल्याचा प्रतिआरोप राजश्री अहिरराव यांनी या सगळ्या प्रकारणात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले नसून त्यांचावरच हल्ला झालाय; विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT