Akshay Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Akshay Shinde Encounter : लॉक बंदूक अनलॉक कशी झाली? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर १३ प्रश्न, उत्तरे कोण देणार?

Badlapur sex abuse accused : अक्षय शिंदे याचा सोमवारी रात्री एन्काउंटर झाला. यामुळे गृहविभाग आणि पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील शाळकरी मुलीसोबत झालेल्या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. बदलापूरजवळ झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या. विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. अक्षय शिंदे याच्या एनकाउंटरने पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

अक्षय शिंदे याचा सोमवारी रात्री एन्काउंटर झाला. यामुळे गृहविभाग आणि पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अक्षयच्या एन्काऊंटरवर 'साम'चे सवाल

  1. आरोपी अक्षय शिंदे याला जेलमधून न्यायालयात नेणे आवश्यक होते, पण त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?

  2. पोलिसांची रिव्हॉल्वर लॉक असते. आरोपीच्या तोंडावर काळ्या कपड्याचा मास्क होता. त्यातून त्याला पोलिसांच्या खिशातील रिव्हॉल्वर कशी दिसली? जर अक्षय शिंदे याने रिव्हॉल्वर हिसकावून घेतले, त्यावेळी पोलीस काय करत होते. अक्षय शिंदेच्या हातात बेड्या नव्हत्या का?

  3. रिव्हॉल्वर लॉक होते तर ते आरोपी अक्षय शिंदेला उघडता कसे आले ?

  4. आरोपी अक्षय शिंदेसोबत गाडीत पाच ते सहा पोलीस होते. तरीही अक्षय शिंदेने रिव्हॉल्वर कसं हिसकावले?

  5. गाडीत पाच-सहा पोलिसांसोबत असताना आरोपी अक्षय शिंदेला जीवघेणा हल्ला करणं कसे शक्य झाले?

  6. अक्षय शिंदे याला चौकशीसाठी घेऊन जाताना बेड्या घातल्या नव्हत्या का ?

  7. कुठल्याही आरोपीला एका चौकशीसाठी घेऊन जाताना चार -पाच पोलीस असतात... अक्षय शिंदेला घेऊन जाताना किती पोलीस होते.. त्या सर्वांना चकमा देऊन अक्षय शिंदेने रिल्हॉल्वर घेतले का?

  8. बदलापूर प्रकऱणात गुन्हा दाखल कऱण्यास पोलीसांना २४ तास घेतले होते. अक्षयवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप झाला होता, आता सबंधित पोलिसांची चौकशी होणार का?

  9. संबंधित शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही?

  10. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणी जलदगतीनं होणार होती, त्याचं काय झालं?

  11. अक्षय शिंदेला पोलिस कोठडीत मारहाण केल्याचा आरोप आई-वडिलांनी केला होता, यात किती तथ्य आहे?

  12. संस्थाचालकांना वाचवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायेत, यावर उत्तर काय?

  13. या घटनेमुळे बदलापूर प्रकरणातील पुढील तपासाला ब्रेक लागणार आणि हे प्रकरण शांत होणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT