बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका रासायनिक कंपनीत आज सोमवारी पहाटे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
जखमींमध्ये लहान मुलीचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही. मात्र, स्फोटानंतर आग लागल्याने कंपनी पूर्णत: जळून खाक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या (Badlapur News) माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं.
आज रविवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कंपनीत रिऍक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत (Fire Broke) भस्मसात झाली.
हा स्फोट इतका भीषण होता की रिऍक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले. यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय.
तर एकावर बदलापूरमधील रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनीला आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, स्थानिकांकडून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.