Badlapur News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur News : तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; बदलापूरच्या पूरनियंत्रण रेषा बाधितांचा इशारा

Badlapur News : कुळगांव- बदलापूर नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या आजूबाजूला दीड किलोमीटर लांबपर्यंत पूर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधित असलेल्या शेतकरी, स्थानिक नागरिक, सोसायट्यांची पदाधिकारी गुरुवारपासून कुळगांव- बदलापूर (Badlapur) नगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. दरम्यान बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधितांनी  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Election) बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. (Live Marathi News)

कुळगांव- बदलापूर नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या (Ulhas River) आजूबाजूला दीड किलोमीटर लांबपर्यंत पूर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे. जलसंपदा विभागांना ही पूर नियंत्रण रेषा आखताना स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि प्रशासन यापैकी कोणालाच विश्वासात न घेता थेट पूर नियंत्रण रेषा टाकली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि रहिवासी यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. असे असताना देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने येथील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व समितीचे पदाधिकारी शरद म्हात्रे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपोषणकर्त्यां पूर नियंत्रण रेषा बाधित शेतकरी व स्थानिक रहिवासी संघर्ष समितीने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT