Akshay Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Badlapur Case: बदलापूर अत्याचार प्रकरणाची चौकशी पूर्ण, पोलीस अधिकारी शुभदा शितोळे निलंबित

Badlapur Case Senior Police Inspector Suspended: बदलापूर लौंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं.

Bhagyashree Kamble

बदलापूर लौंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आलं आहे. असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबाबत ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अॅड. हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली. तसेच हे प्रकरण गांभिऱ्यानं न घेतल्यानं दोन पोलीस हवालदारांना सक्त ताकीदही देण्यात आली.

यासह लैंगिक अत्याचार प्रकरणात मारले गेलेले आरोपी आणि शाळेच्या विश्वास्तांविरूद्ध दोन आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. असे हायकोर्टाला सांगण्यात आलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातर्फे उपस्थित असलेले सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाला आहे आणि एसआयटी बरखास्त झाली आहे. असं त्यांनी सांगितलं.

ऑगस्टमध्ये बदलापूर येथील शाळेच्या स्वच्छतागृहात चार ते पाच वर्षांच्या दोन मुलींवर एका परिचारिकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बदलापुरसह राज्यभरात रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ अनेकांनी आंदोलनंही केलीत. मात्र, अटक करण्यात आलेला आरोपी सप्टेंबरमध्ये पोलिसांच्या वाहनातून हलवत असताना, पोलिसांनी केलेल्या कथित प्रत्युत्तरादाखल गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आणि तपासात दिरंगाई केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल १२ तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला. यानंतर शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली.

'बदलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आलं आहे. त्यांची दोन वर्षांची वेतनवाढही थांबवण्यात आली.' असे एसआयटीचे वकील अॅड. हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं. तसंच दोन हवालदारांनाही तंबी देण्यात आल्याची माहिती त्यांनी न्यायमुर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमुर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, एसआयटी बरखास्त झाली आहे, असं ते म्हणाले. यानंतर न्यायालयानं १९ डिसेंबरला प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

SCROLL FOR NEXT