Badlapur News
Badlapur News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur News: मस्करी मस्करीत मित्राच्या पार्श्वभागात घातलं लाटणं; चाळे करताना व्हिडिओही काढला, बदलापूरमधील धक्कादायक घटना

अजय दुधाणे

बदलापूर : मस्ती मस्तीत तीन ते चार मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राच्या पार्श्वभागात लाकडी लाटणं घातल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये (Badlapur) घडली आहे. यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

बदलापूरच्या मोहपाडा परिसरात २५ वर्षीय पीडित तरुण आणि आरोपी हे वास्तव्याला असून ते एकमेकांचे मित्र आहेत. १२ नोव्हेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित तरुण हा त्याच्या एका मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी तिथे त्याचे आणखी तीन ते चार मित्रही उपस्थित होते. या सर्वांनी मिळून पीडित तरुणासोबत मस्ती म्हणून त्याला शारीरिक (Crime News) त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत लैंगिक चाळे करत त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर त्याच्या पार्श्वभागात लाकडी लाटणं घालण्यात आले.

व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल

या सर्व प्रकारात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र यानंतर आरोपी तरुणाने पीडित तरुणाला त्या घटनेचा व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित तरुणाने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तातडीने तपासाची चक्रं फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील इतर आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics | माढ्यात Sharad Pawar गटाला धक्का! Dhaval Singh Mohite Patil भाजपमध्ये जाणार?

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका

Sharad Pawar Speech : इथून पुढे मातीची कुस्ती कमी होईल, मॅटवरचा सराव हवा; शरद पवारांचा राज्यातील कुस्तीपटुंना सल्ला

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

SCROLL FOR NEXT