Badlapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Crime News: कार्यक्रमाला जाताना शेजाऱ्याला दिली घराची चावी; संधी साधत चोरले २ लाखाचे दागिने

कार्यक्रमाला जाताना शेजाऱ्याला दिली घराची चावी; संधी साधत चोरले २ लाखाचे दागिने

अजय दुधाणे

बदलापुर : बदलापूरमध्ये शेजाऱ्यांनीच शेजाऱ्याच्या घरात चोरी केली असून तब्बल २ लाखांचे सोन्याचे दागिने शेजाऱ्यांनी (Theft) कपाटातून चोरले. या प्रकरणी (Badlapur) बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. (Breaking Marathi News)

बदलापूर पश्चिममधील चिंतामणी तथास्तु अपार्नमेंटमध्ये शेजाऱ्यांने शेजाराच्या घरात चोरी केल्याने नागरिकांचा विश्वास या शब्दावरचा विश्वासच नाहीसा होत आहे. तुम्ही जर एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर जात आहेत आणि विश्वासाने घराची चावी आणि जबाबदारी शेजाऱ्याला सोपवत असाल तर जागे व्‍हा. बदलापूर पश्चिम परिसरात तथास्तु को ओपरेटिव्ह सोसायटीत राहणारे निनाद देसाई आपल्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांताक्रूझ येथे गेले होते. मात्र जाताना त्यांनी त्यांच्या घराची चावी सोसायटी वाचमेन आणि शेजारी राहणारे रवींद्र हरी विशे यांना दिली होती.

दरम्यान घरी आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता सर्व काही व्यवस्थित होते. मात्र कपाटातील सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. यामध्ये सोन्याचा हार, ब्रेसलेट, अंगठी असे तब्बल २ लाख रुपयांचे दागिने असून यासंदर्भात निनाद देसाई यांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी आरोपीला योग्य ती शिक्षा आणि गेलेले दागिने परत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुन क्षिरसागर यांनी कारवाई करत संशयित आरोपी म्हणून शेजारी रवींद्र हरी विशे आला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; कार्ला फाट्याजवळ ५ किमीपर्यंत रांग

Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

SCROLL FOR NEXT