Bacchu kadu saam Tv
महाराष्ट्र

Bacchu kadu : जेव्हा रट्टा मारायचा तेव्हा मारू; उमेदवारांवरून बच्चू कडूंचा अप्रत्यक्षपणे राणा दाम्पत्याला टोला

Lok Sabha Election : आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे एकजूट मत घेऊनच आम्ही पुढचा निर्णय काही दिवसातच घेऊ असं म्हटलं आहे. बच्चू कडू यांचा इशारा कोणाकडे होता, असा प्रश्न केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bacchu kadu Lok Sabha Election:

अमरावती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे एकजूट मत घेऊनच आम्ही पुढचा निर्णय काही दिवसातच घेऊ, जनसामान्यांचा उमेदवार लोकसभेसाठी जनतेला मिळाला नाही तर पाच जिल्ह्यापैकी एक खासदार हा प्रहारचा जनशक्ती पक्षाचा राहील,असं आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले.(Latest News)

महायुतीचे घटक असूनही प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय. येत्या काही दिवसात बच्चू कडून या निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शेतकरी, शेतमजूर सर्व गोष्टींचा विचार करून आपण एक मसुदा तयार करणार आहोत. आम्हाला कुठे खेडी फोडायची आहे? यावर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. आम्ही कोणाला तिकीटसाठी विनंती करणार नाही. आम्हाला सहभागी करून घ्या असं म्हणणार नाही. हा भिकारीपणा आम्ही करणार नाही त्याची गरज नसल्याचं आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले.

प्रहार हा तालुका किंवा जिल्हा पुरता मर्यादित विषय नाही. राज्यात खालूनवर पर्यंत आमचा कार्यकर्ता आहे.लोकसभा निवडणुकीत कुठे कशी लढवायची हे आम्ही नक्की ठरवू.११ एप्रिल रोजी बच्चू कडू अंतिम निर्णय घेणार आहोत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी जाहीर करणार. परिस्थिती पाहून आम्ही योग्य निर्णय घेऊ. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे जेव्हा रट्टा मारायचा तेव्हा आम्ही मारू, असं म्हणत बच्चू कडूंनी अप्रत्यक्षपणे राणा दाम्पत्याला टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT