Bacchu Kadu Controversial Statement saamtv
महाराष्ट्र

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Bacchu Kadu Controversial Statement: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय.. मात्र त्यांच्या एका विधानामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी कडूंवर चांगलाच हल्लाबोल केलाय. बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? शेतकऱ्यांना त्यांनी कोणता अजब सल्ला दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंचे वादग्रस्त वक्तव्य

  • बच्च कडूंच्या या वादग्रस्त विधानांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाचा आक्षेप

  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारचा कानाडोळा

ऐकलतं, प्रहारच्या बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या हे विधान. एकीकडे ओल्य़ा दुष्काळानं शेतकऱ्याचं कंबरंड मोडलंय. पिकं, शेतातली माती, घरदार, जनावरं सगळं पाण्यात वाहून गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्य़ा प्रश्नांसाठी राज्यभर मोर्चे, परिषदा होतायत.अशातच बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंनी हे वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय.बच्चू कडू नेमकं काय म्हणालेत ऐका.

दरम्यान बच्चू कडू शेतकरी परिषदेत इतकचं बोलून थांबवले नाहीत. तर त्यांनी शेतकऱ्यांबद्द्लही वादग्रस्त विधानं केली. दुसरीकडे बच्च कडूंच्या या वादग्रस्त विधानांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आक्षेप घेतलाय. ओल्या दुष्काळावर सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असंल तरी ही अपुरी मदत शेतकऱ्याच्या दुखांवर फुंकर घालण्यासाठी पुरेशी नाहीय.

त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकार कानाडोळा करतयं. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. अशावेळी कडूंच्या विधानातून समाजातील उद्विग्नता, अस्वस्थताच समोर येतंय.. हे जरी मान्य केलं तरी एखाद्या लोकप्रतिनिधीकडून केल्या जाणाऱ्या अशा वक्तव्याचं मात्र समर्थन करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT