Bachchu Kadu On Cabinet Expansion saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये; महायुतीच्या जागावाटपावर बच्चू कडू यांचं भाष्य

Lok Sabha Election : त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्याव तो त्यांचा प्रश्न आहे, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Bachchu Kadu On BJP :

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीमध्ये भाजपकडून शिंदे गटावर दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपवर निशाणा साधत सूचक विधान केलं आहे. भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

विविध सर्वेक्षणे, स्थानिक नेत्यांचे फिडबॅक या आधारे शिंदेंनी त्यांचे काही उमेदवार बदलले पाहिजेत, असं भाजपने सुचवल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) जागेचाही समावेश आहे. यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले की, भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्याव तो त्यांचा प्रश्न आहे.

"मी फक्त अमरावती पुरताच बोलेल. एक खासदार शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी याचं दुकान बंद कळण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारने केली आहे. किराणा, कापड उद्योग बंद झालेले दिसेल. ती अवस्था आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बुब यांना तिथे पाठवायच आहे, असंही बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं.

भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत.

आज नामांकन यात्रा काढली जाणार असून आजच्या रॅलीने हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे की ही निवडणूक नाहीं तर जन आंदोलन आहे. नेते लाचार झालेले आहेत, पण आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रहार हे निमित्त आहे, असा विश्वास यावेळी बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT