Babri Masjid Brick Saam TV
महाराष्ट्र

Babri Masjid Brick: बाबरी मशिदीच्या वीटेचं होणार संशोधन; भारत इतिहास संशोधन संस्थेकडून रहस्य येणार बाहेर?

Raj Thackeray: महाराष्ट्राकडे इतिहास आहे, बाकी सगळीकडे फक्त भूगोल आहे. काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी इतिहास प्रत्येकाने वाचला पाहीजे, महाराष्ट्राचा इतिहास तर वाचलाच पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Ruchika Jadhav

Political News:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेत आले होते. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर तेथून आणलेली वीट राज ठाकरेंनी संशोधन संस्थेला दिली आहे. ही वीट बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना भेट दिली होती. वीटेवर अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणत राज ठाकरेंनी ही वीट आता संस्थेला दिली आहे.

बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी आणलेली वीट राज ठाकरेंनी भारत इतिहास संशोधन संस्थेला दिली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, बाबरी पडली त्यावेळी बाळा नांदगावकर तिकडे होते. त्यावेळी त्यांनी दोन वीटा आणल्या. त्यातील एक या मंडळाला दिली आहे. या वीटा पाहा, बाबरी पडली ती काही अशीच नाही पडली. त्यावेळी बांधकामासाठी टेंडर काढत नव्हते, या वीटेवर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी संस्थेला देत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.

भारत संशोधक मंडळात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्याला कारण पण तसे आहे. महाराष्ट्राकडे इतिहास आहे, बाकी सगळीकडे फक्त भूगोल आहे. काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी इतिहास प्रत्येकाने वाचला पाहीजे, महाराष्ट्राचा इतिहास तर वाचलाच पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, माझ्याकडून काही तरी करावं असं वाटतंय म्हणून मी मनसेकडून या संस्थेला २५ लाख रुपये देणगी देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की इतिहास कळला असे नाही, त्याचा अभ्यासही करावा लागतो. यावेळी राज ठाकरेंनी सदाशिव पेठ येथील इमारतीचा पुनर्विकास करण्यात याबाबतची माहिती देखील जाणून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT