Baba Ramdev Latest News
Baba Ramdev Latest News Saam TV
महाराष्ट्र

Baba Ramdev : बाबा रामदेव यांना ते वक्तव्य भोवणार? महिला आयोगाने पाठवली नोटीस

साम टिव्ही ब्युरो

Baba Ramdev Latest News : योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीका होत आहे. अशातच बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण, त्यांना महाराष्ट्र महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये त्यांना दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

'ठाण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच लागेल, असं अभद्र वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार महिला आयोगाकडे आली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची माहिती घेतली. आम्ही याचा तीव्र शब्दात विरोध करतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा दोन दिवसात आयोगाच्या कार्यालयात करावा,' असं ट्वीट महिला आयोगाने केलं आहे.

बाबा रामदेव काय म्हणाले होते?

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. 'साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात', असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर महिला नेत्या आक्रमक

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील महिला आक्रमक झाल्या आहेत. महिला नेत्यांकडून सुद्धा बाबा रामदेव यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुपाली ठोंबरे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना काळं फासणार असल्याचा इशारा दिला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या महिला नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)  यांनी देखील बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी बाबा रामदेव यांच्यावर टीका केली आहे. त्यातच आता बाबा रामदेव यांनी महिला आयोगाने सुद्धा नोटीस पाठवली असून केलेल्या वक्तव्याचा दोन दिवसात खुलासा करावा, असं नोटीसीत म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother's Day: कामानिमित्त घरापासून लांब आहात? मग 'मदर्स डे'ला अशा पद्धतीने आईला खुश करा

Travelling Tips: विमानातून प्रवास करताना परफ्यूम आणि डिओड्रंट न्यायला बंदी, पण का?

Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

SCROLL FOR NEXT