'मी मित्राला घेऊन ताज हॉटेलमध्ये जेवायला...'; फडणवीसांनी सांगितला २६/११ हल्ल्याच्या दिवसाचा 'तो' किस्सा

कार्यक्रमात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीचा एक किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : मुंबईवर २६/११/२००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मुंबईत पांचजन्य आयोजित २६/११ मुंबई संकल्प या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावली. या कार्यक्रमात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीचा एक किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
'२६/११ हल्ल्याची माहिती आपल्याकडे आधीच होती, पण...'; देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं उणीवेवर बोट

मुंबईतील या कार्यक्रमात '२६/११ आणि मुंबई सुरक्षा' या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीचा एक किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले, '२६/११ चा दहशतवादी हल्ला हा हल्ला सुनियोजित होता. ताज हॉटेलमध्ये अनेक कार्यक्रम होतात. ट्रायटेण्ड हॉटेलमध्ये अनेक कंपन्याचे ऑफिस आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीवर तो हल्ला होता. पण तो सार्वभौमत्वावर हल्ला होता'.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले,'२६/११ ला त्यावेळी मी आमदार निवासात होतो. त्यावेळी माझे एक मित्र आले होते. त्यांना मी घेऊन ताजला जेवायला जाणार होतो. पण ते म्हणाले आपण हयातला जाऊ जेवायला. मग मी त्यांना घेऊन हयातला गेलो'.

'मुंबई ओस पडावी या विचाराने दहशतवादी हल्ला झाला. मात्र, पुढील ८ दिवसांत मुंबईकर रस्त्यावर उतरले. हा दहशतवाद्यांच्या विचारांचा पराभव झाला, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis
Gunvant Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा निषेध; मराठा संघटनेचे कार्यकर्ते का झालेत आक्रमक?

फडणवीसांनी २६/११ च्या हल्ल्यावरून तत्कालीन सरकारच्या उणीवेवर बोट

'२६/११ च्या हल्ल्याची माहिती आपल्याकडे आधीच होती. पण समन्वय नव्हतं. आपले अपयश लपवण्यासाठी सरकार अनेकदा असे रिपोर्ट लपवले जातात. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यावर त्या अहवालातील अंमलबजावणी सुरू केली, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ च्या हल्ल्यावरून तत्कालीन सरकारच्या उणीवेवर बोट ठेवलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com