Omicron news update saam tv
महाराष्ट्र

ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनं धास्ती वाढली; पहिल्यांदाच आढळले B.A.4 आणि B.A 5 विषाणूचे ७ रुग्ण

राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण (corona) दिवसागणिक वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. ओमिक्रॉनच्या B.A 4 व्हेरियंट आणि B. A 5 या व्हेरियंटनं (omicron new variant) राज्यात डोके वर काढले असून, पहिल्यांदाच राज्यात या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या दोन्ही व्हेरियंटचे एकूण ७ रुग्ण असून, ते पुण्यातील आहेत. दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्याही वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शून्य मृत्यूची (corona deaths) नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, राज्य सरकारनंही चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क घालण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जालन्यात बोलताना, मास्क सक्तीबाबत विचार करण्याबाबत सूचक विधान केले होते. त्याचवेळी राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शनिवारी गेल्या २४ तासांतील कोरोना अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच कालावधीत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात पहिल्यांदाच B.A.4 आणि B.A.5 व्हेरियंटचे ७ रुग्ण

राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या B.A.4 आणि B.A.5 व्हेरियंटचे ७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या समन्वयाने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून, पुण्यातील ७ रुग्णांना या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. ४ रुग्णांना B.A.4 व्हेरियंटचा, तर ३ रुग्णांना B.A.5 व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील असून, ४ ते १८ मे या कालावधीतील आहेत. या ७ रुग्णांमध्ये ४ पुरूष आणि ३ महिला आहेत. ४ जण हे ५० वर्षांवरील आहेत. तर दोन हे २० ते ४० वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण १० वर्षांखालील आहे.

राज्यात आज एकही कोरोना मृत्यू नाही

राज्यात गेल्या २४ तासांत ३२५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत ७७,३४,७६४ रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९८.०९ टक्के इतका आहे. ५२९ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर या कालावधीत एकही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

SCROLL FOR NEXT