Ayodhya Poul  Saam Tv
महाराष्ट्र

Ayodhya Poul : उद्धव ठाकरेंना सांगा मुंब्य्रात येऊ नका!; पोलिसांनी फोन केल्याचा अयोध्या पौळ यांचा दावा, पुरावाच दिला

Ayodhya Poul : अयोध्या पौळ यांनी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यातील झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केलाय.

Bharat Jadhav

Ayodhya Poul On Uddhav Thackeray Mumbra Visit :

ठाकरे गट आणि शिवसेनेतील वादामुळे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात वातावरण तापलंय. मुंब्रा शहरातील ठाकरे गटाची शाखा पाडण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. याच घटनेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज मुंब्य्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा भेटीला शिंदे गटाने विरोध दर्शवलाय. दोन्ही गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय. परंतु पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांकडून केला जात आहे.

शिंदे गट पोलीस यंत्रणेवर कशाप्रकारे कसा दबाव टाकत उद्धव ठाकरेंचा दौरा रद्द करण्यास सांगितलं जात आहे. याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळने दिलीय. अयोध्या पौळ यांनी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यातील झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. पौळ यांनी यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना आधीच दिलीय.

पौळ यांनी या आशयाची पोस्ट फेसबूकवर शेअर केलीय. त्यांनी लिहिलेल्या पोस्ट अनुसार, उद्धव ठाकरेंना मुंब्य्रात येऊ नका देऊ, असं पोलिसांनी त्यांना सांगितल्याचं पौळ म्हणाल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे अयोध्या पौळ यांची पोस्ट?

काल रात्री मला पोलिस अधिकारी फोन करुन सांगतात की "ताई उद्धव ठाकरे साहेबांना उद्या येऊ नका म्हणून सांगा" त्यावर मी त्यांना म्हणाले "मी साहेबांना सांगावं इतकी मोठी नाही मी आणि तुम्ही सांगा तुम्हाला जे सांगायचे ते".

आत्ता १४४च्या नोटीसची बातमी पाहिली आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर हे मांडले. सदरील फोन व अधिकारी अन माझ्यातील संभाषण आदरणीय पक्षप्रमुख व जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कानावर घातलेलं आहे ऑलरेडी.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात अतिशय हालव्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. जी शाखा पाडण्यात आली ती शाखा आपलीच होती, असा दावा शिंदे गटाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

SCROLL FOR NEXT