कुपोषणाकडून सुपोषणाकडे जाण्यासाठी पारंपारिक रानभाज्यांची जनजागृती मोहीम दिनू गावित
महाराष्ट्र

कुपोषणाकडून सुपोषणाकडे जाण्यासाठी पारंपारिक रानभाज्यांची जनजागृती मोहीम

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: कुपोषणाकडून सुपोषणाकडे जाण्यासाठी पारंपारिक रानभाज्यांची जनजागृती मोहीम नंदुरबारमध्ये राबवण्यात आली. सातपुडा पर्वत रांगेतील जंगलाची संपदा असलेल्या रानभाज्या महोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती. सोबतच अतिदुर्गम असलेल्या धडगाव तालुक्यातील डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत कंजाला गावापर्यंत पायपीट करत विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली. (Awareness campaign of traditional raanbhaji to move from malnutrition to healthy)

हे देखील पहा -

अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत कंजाला गावात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष डोंगर चढून विकासकामे व या ठिकाणी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला भेट दिली. सातपुडा पर्वत रांगेतील जंगलाची संपदा असलेल्या रान भाज्या, कंदमुळे, औषधी वनस्पती व जनजाती समुदायाच्या खाद्यसंस्कृतीचे गाव, शहरांना परिचय व्हावा या उद्देशाने या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कुपोषणाचा कलंक दूर करण्यासाठी रानभाज्यांच्या माध्यमातून चांगल्या पाककृती लोकांपर्यंत पोहोचाव्यात, सातपुड्यातील हा खजीना केवळ जंगला पर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण जगाला त्याची माहिती मिळावी या दृष्टीने असे महोत्सव महत्वाची भूमिका निभावीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कंजाला गावात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष डोंगर चढून विकासकामे व या ठिकाणी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला भेट दिली.

दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कंजाला गावाच्या पाड्यावर प्रत्येक घरांपर्यंत पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या पाहणीसह कुपोषणावर उपयुक्त असलेल्या भगर युनिट प्रकल्प, एकलव्य आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून जैवविविधता प्रकल्पातून गांडूळ खत निर्मिती व सेंद्रिय शेतीची पाहणी केली. जिल्ह्यातील आदिवसी भागात सतत भेडसावणाऱ्या बालक व मातांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी या खाद्यसंकृतीचा पारंपारिक व आधुनिक पद्धतीने वापर करून सुपोषण कसे करता येईल याबाबत माहिती देण्यात आली.

या महोत्सवात पंचक्रोशीतील महिलांनी जंगलात आढळणाऱ्या त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग असणारे विविध पाले-भाजी, कंद, फुले, फळे, बिया, पाने यांचे स्टॉल लावले होते. यात आहालो, हेल्टा पाजो, नाथडो पाजो, तोंदन्या फुल, शिरावाटा, देवपेंडी, पोवाड्या, जंगली कांदा आदी भाज्यांचा अनेक जाती होत्या. तर पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या खाद्यांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. अंबाळी लोणचे, शेवग्याचे सूप, साग व बांबूची भाजी आदींचा समावेश होता. शहरी भागातून आलेल्या नागरिक व महिलांनी या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

SCROLL FOR NEXT