Maharashtra Unseasonal rain Update Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Unseasonal Rain : राज्यावर अवकाळीचं संकट! ४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले, आज कुठे कुठे इशारा?

Maharashtra weather forecast today : बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा पुढील अंदाज जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra Unseasonal rain Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मात्र तापमानात वाढ कायम राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे. (Weather Alert LIVE Updates: Unseasonal Rain To Hit Maharashtra; IMD Issues Yellow Alert for East Vidarbha Districts Amid Rising Heat Check Forecast)

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज (ता. २३) पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला आहे.

वादळी पावसाचा इशारा कुठे कुठे?

चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली.

राज्यात कुठे कुठे पावसाने झोडपले -

मागील २४ तासात राज्यातील काही भागाला पावसाने झोडपले. मध्य रात्री नागपूर शहारासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळला. - ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे रात्री नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर ऊन असताना रात्री अचानक पाऊस आला. रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापुरात परिसरात तुफान पाऊस

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या दाजीपूर फोंडाघाट परिसरात अचानकच तुफान पाऊस सुरू झाला. एका बाजूला उकाड्याने हैराण झालेल्या या दोन्ही जिल्ह्यांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला.

भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

भंडाऱ्यात पहाटे पाच वाजतापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुळ, मुंग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवसात विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गोंदियात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे होणार फायदा, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT