Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: ठाकरे Vs शिंदे! सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने- सामने

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद - शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे 2 गट निर्मण झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्र्याची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दोन्ही गट सतत एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळतात. मात्र पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहे. (Aurangabad Political News)

विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) जाहीर सभेतून तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पदाधिकारी संवाद कार्यक्रमातून भाषण करणार आहे. त्यामुळे या होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त वाढवला आहे. कृषिमंत्री यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे होणाऱ्या या सभेचे आयोजन करण्यात आलंय. सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशालेच्या ५ एकर मैदानावर श्रीकांत शिंदेची आज सायंकाळी ४ वाजता सभा होत आहे. यापूर्वी ते विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.

तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेतकरी व शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. या मैदानावर उभारण्यात आलेले व्यासपीठ २० बाय ३० आकाराचे असून या मैदानावर पाच हजारपेक्षा जास्त नागरिक बसण्याची क्षमता आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले आहे.त्यामुळे आज सिल्लोड शहरात छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये शांतिगीरी महाराज यांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज?

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

Harsul Sawangi Road Accident: बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

SCROLL FOR NEXT