बाबो ! प्राचार्यांना ऑनलाइन रमीचा नाद, कॉलेजमध्ये मारला दहा लाखांवर डल्ला

चोरीच्या पैशांवरच केली दिवाळी साजरी अन् आता आली पश्चातापाची वेळ
Aurangabad Crime news
Aurangabad Crime newsSaam Tv
Published On

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील श्री साई इंजिनिअरिंग महाविद्यालयात चक्क प्राचार्यानेच दहा लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 3 लाख रुपये प्राचार्याने ऑनलाईन रमीत घातले. तसेच चोरीच्या पैशांवरच दिवाळी साजरी केली.

गुन्हे शाखेला त्याच्यावर संशय आल्याने पाळत ठेवली असता, 5 लाख 18 हजार रुपये घेऊन पळून जाताना प्राचार्याला पोलिसांनी (Police) आंबेडकर चौकातून अटक केली. निलेश आरके असे अटकेतील प्राचार्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने प्राचार्याच्या ताब्यातून 5 लाख 18 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त करुन एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Aurangabad Crime news
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबरच्या रात्री श्री साई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चोरी झाली होती. यावेळी दहा लाख रुपये चोरीला गेले होते. त्यानंतर 22 ऑक्टोबरला एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

तपास करत असतानाच गुन्हे शाखेला चोरी ही कॉलेजमधील व्यक्तीनेच केल्याचा संशय आल्याने त्यांनी तपास त्या दिशेने सुरु केला. चोरी झालेल्या रात्री नीलेश आरके हा रात्री 12 वाजेपर्यंत कॉलेजात थांबल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संस्थाचालकाच्या सांगण्यावरूनच तो ऍडमिशनच्या कामासाठी तांबला होता असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी त्याचे संगणक तपासल्यावर त्याने रात्री 8 वाजेपर्यंतच काम केल्याचे समोर आले.

त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. दरम्यान तो घरातील रोकड घेऊन बुलढाणा येथे पळून जाणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी आंबेडकर चौकातून अटक केली. यावेळी त्याच्याकडे 5 लाख 18 हजार रुपयांची कॅश मिळून आली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com