Aurangabad RTO News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad RTO: नादच खुळा! वाहनांच्या चॉईस नंबरसाठी औरंगाबादकरांनी मोजले कोट्यवधी रुपये; '9' नंबर सर्वात लकी...

aurangabad rto choice number: 1111, 5555, 4444, 7777, असे एकच आकडे वाहनधारकांना पसंत पडतात, त्यामुळे महसुलात औरंगाबाद आरटीओ मालामाल झालं आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Aurangabad Latest News: औरंगाबादकरांच्या हौशेला काही मोल नाही. कारण एकाच वेळेस शंभर मर्सिडीज आणि अडीचशेहुन अधिक EV कार खरेदी करणाऱ्या औरंगाबादकरांच्या आवडीच्या नंबरसाठी तब्बल २०२१-२०२२ या वर्षात ७ कोटी खर्च केलेत. त्यामुळे महसुलात औरंगाबाद आरटीओ मालामाल झालं आहे. (vip number rto)

कोल्हापुरात जसा नाद खुळा असतो, तशी औरंगाबादकरांची (Aurangabad) हाऊस पण जबरा असते. एकदा ठरलं की सगळी धूम असते. महागडी कार, महागडी वाहने खरेदीची हौस तरी जुनीच आहे. पण त्या गाड्यासाठी लागणाऱ्या नंबरसाठी औरंगाबादकरांनी २०२१-२०२२ या काळात तब्बल सात कोटी रुपये मोजलेत. नवीन गाडी घेतल्यानंतर कोणी आपला पसंतीचा क्रमांक, कोणी पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंतीक्रमांकाची आली पाहिजे, यासाठी वाट्टेल ती किंमत मोजतो.

वर्षभराच्या काळात चारचाकी किंवा दुचाकीच्या पसंती क्रमांकासाठी तब्बल ६ कोटी ५२ लाख ३४ हजार ५०० रुपये औरंगाबादकरांनी मोजले आहेत. औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतून २०२१-२०२२ या वर्षात ७ हजार १६० वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी शहरवासीयांनी करोडो रुपये मोजल्याचे समोर आले आहे.  (Maharashtra News)

अनेक वाहनधारक नवीन वाहन घेताना आपल्या पसंतीच्या क्रमांकासाठी धडपड करत असतात. त्या क्रमांकासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. विशेष म्हणजे '9' या क्रमांकातून सर्वाधिक महसूल मिळाला. वाहनधारक आपला लकी किंवा आवडीचा क्रमांक म्हणून ९ नंबरची मागणी मोठ्या प्रमाणात करत केली. त्या पाठोपाठ 1111, 5555, 4444, 7777, असे एकच आकडे वाहनधारकांना पसंत पडतात, त्यामुळे महसुलात औरंगाबाद आरटीओ मालामाल झालं आहे. (Latest Marathi News)

चॉईस नंबरसाठी कोट्यवधीची उधळण करणारे औरंगाबादकर कधी कधी आवडीच्या नंबरची सिरीज येईपर्यंत गाडीही खरेदी करीत नाहीत. इतकंच नाही तर एकाच नंबरसाठी अनेकांची मागणी असेल तर बोली लावून लागेल तितके पैसे मोजायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत, त्यामुळे औरंगाबादकरांच्या या हौशेचीही चर्चा तर होणारच.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

Jalgaon News : गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट; ४ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT