Aurangabad Crime: लज्जास्पद! महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार SaamTv news
महाराष्ट्र

Aurangabad Crime: लज्जास्पद! महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार

2 महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: 2 महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार (sexual assualt ) करणाऱ्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी (police) अटक (Arrested) केली आहे. संभाजी आसाराम शिंदे असे आरोपीचे नाव आहे. मुलाला कंपनीत (company) कामाला लावून देतो, अशी थाप मारून दीड महिना महिलेला क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, एका महिलेसह तिच्या मुलाला कंपनीमध्ये कामाला लावून देण्याचे आमिष दाखविले होते. या महिलेला 26 नोव्हेंबर 2021रोजी मुकुंदवाडी भागातील रेल्वे गेट नंबर 56 येथे बोलावून घेतले होते. तेव्हा कंत्राटदार शिंदेने महिलेसह मुलाला एका रिक्षामध्ये बसवून त्या दिवशी शेंद्रा एमआयडीसी (MIDC) येथील एका कंपनीमध्ये काम दिले. काम संपल्यानंतर महिलेला आणि मुलाला घरी सोडतो म्हणून स्वतःच्या गाडीत बसवले. गाडी घरी न नेता क्रांती चौक परिसरातील एका खोलीजवळ उभी केली.

त्यानंतर एका खोलीमध्ये महिलेवर कंत्राटदार शिंदे याच्यासह त्याच्या एका मित्राने २ महिने तिच्यावर बलात्कार केले आहे. तर दुसऱ्या खोलीमध्ये १४ वर्षाच्या मुलाला मारहाण केली आहे. महिलेने 15 जानेवारी रोजी शिंदे यांच्या तावडीतून मुलाने कशीबशी सुटका करून घेतली होती. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस गुन्हा दाखल झाला होता. त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

SCROLL FOR NEXT