Aurangabad Renaming
Aurangabad Renaming  Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Renaming : एकनाथ शिंदे यांचा रिमोट फडणवीसांकडे...; नामांतरावरून इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Imtiyaz Jaleel on Aurangabad Renaming : औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे ठेवावे यासाठी केंद्राकडून मंजूरी मिळाली आहे. त्यावरुन आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Aurangabad Renaming News)

एकनाथ शिंदे यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. इतिहास वाईट आणि चांगला असा दोन्ही देखील असतो. औरंगाबाद एक चांगलं शहर आहे.नाव बदलल्याने त्याचे काय परिणाम होतील हे या सरकारला समजत नाही, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

नाव बदलल्यानंतर जिथे ८ दिवसांनी पाणी येतं तिथे पाणी येणार.बेरोजगारी असणाऱ्या ठिकाणी आता नोकऱ्या मिळणार. नावासाठी लोकांच मन वळवण्याचं काम सुरू आहे. आम्ही याचा तिव्र शब्दात निषेध करतो, असं जलील म्हणाले.

पुढे शिवसेनेत झालेल्या दोन गटांवर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की, 'दोन गट झालेत. त्याऐवजी 3 किंवा ४ गट होउदे.एकनाथ शिंदे यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. शिवसेनेचा जन्म काँग्रेस राष्ट्रवादी विरोधासाठी,मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरे आघाडीत गेले, अशी टीका इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

आज नवी मुंबईत एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे.या अधिवेशनाला एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी व इम्तियाज जलील उपस्थित राहणार आहेत. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुका यासंदरभात या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहेत. दरम्यान या अधिवेशनानंतर एमआयएमकडून मोठं आंदोलन केलं जाणार असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Tips : ऑफिसमध्ये बसल्या बसल्या झोप येतेय? या ५ चुका सुधारा

Sindhudurg : झुलत्या पुलानजिक पोहण्याच्या मोह आला अंगलट, वेंगुर्ल्यात युवकाचा बुडून मृत्यू, मच्छिमारांनी एकाला वाचवले

SBI Interest Rate Hike: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खुशखबर! FD वरील व्याजदर वाढवले; व्याजाचं गणित समजून घ्या

व्हॉट्सअपच्या Chat Lock फिचर्सचा उपयोग काय?

Kids Childhood : 'या' चुकांमुळे तुमची मुलं बालपणाला मुकतील

SCROLL FOR NEXT