Chatrapati Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Chatrapati Sambhajinagar: इअरफोन कानात घालून बोलणे बेतले जीवावर; तरूणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

इअरफोन कानात घालून बोलणे बेतले जीवावर; तरूणाचा रेल्वे खाली आल्‍याने मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : कंपनीत नाईट शिप्‍टचे काम आटोपून घरी परतताना तरूणाचा दुर्देवी मृत्‍यू झाला. (railway) रेल्‍वे लाईन क्राॅस करत असताना कानात इअरफोन लावले होते. यामुळे रेल्‍वे येत असल्‍याने तरूणाच्‍या लक्षात आले नाही. यात रेल्‍वेची जोरदार धडक (Accident) बसल्‍याने तरूणाचा चिरडून मृत्‍यू झाला. (Tajya Batmya)

रेल्‍वे रूळ ओलांडणे हा मुळात गुन्‍हा आहे. याबाबत रेल्‍वे प्रशासनाकडून देखील वारंवार आवाहन केले जात असते. तरी देखील बेफिकीरपणाने रेल्‍वे रूळ ओलांडत असतात. यात अनेकजण तर कानात इअरफोन लावून (Aurangabad) बोलत किंवा गाणे ऐकत जात असतात. अशात रेल्‍वे रूळ क्राॅस करताना डावी– उजवीकडे न पहाता सरळ क्राॅसिंग करत असतात. यामुळे अपघात झाल्‍याच्‍या घटना देखील अनेकदा घडल्‍या आहेत. अशीच घटना आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील मुकूंदवाडी भागात घडली.

घरी जाताना मृत्‍यूने गाठले

आज सकाळच्या सुमारास मुकुंदवादी भागातील घटना घडली. रमेश लक्ष्मण गुंड (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. रमेश हा रात्रपाळी करून कंपनीतून सकाळी घरी जात होता. या दरम्‍यान त्‍याने कानात इअरफोन घालून रेल्वे पटरी ओलांडत असताना दुर्घटना घडली. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

SCROLL FOR NEXT