Sanjay Shirsat Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: राष्ट्रवादी भाजपसोबत यायला एक पायावर तयार; आमदार संजय शिरसाट

राष्ट्रवादी भाजपसोबत यायला एक पायावर तयार; आमदार संजय शिरसाट

माधव सावरगावे, औरंगाबाद

संभाजीनगर : राष्ट्रवादी सुद्धा आता एक पायावर आमच्यात यायला उडी मारायला तयार आहे. उद्धव साहेबांना सगळे सोडून जाताय, वाईट आहे. अजित पवार (Ajit Pawar) काहीही करू शकतात, कुठेही जाऊ शकतात. मला तर वाटते ही एनसिपीने टाकलेली गुगली आहे. याचा खरा अर्थ म्हणजे शिवसेनेची (Shiv Sena) साथ सोडायची तयारी यांची सुरु आहे. अनेक उरलेले आमदार लवकरच आमच्यात दिसतील; असे वक्‍तव्‍य आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. (Maharashtra News)

अमित शाह, अगदी मोदीजी मातोश्रीवर यायचे आणि काल तुम्ही उद्धव साहेबांना पवार यांच्या घरी घेऊन गेले. ही खरी विचारांशी प्रतारणा आहे. संजय राऊतने (Sanjay Raut) सिल्वर ओकवर घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणून पहिली लाथ याना मारावी यांनी मातोश्रीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे; असेही आमदार संजय शिरसाट म्‍हणाले.

राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली

चंद्रकांत दादा जे काही बोलले त्याबद्दल त्‍यांनी दिलगिरी व्यक्त केली; यामुळे विषय संपला होता. तरी देखील आता संजय राऊत म्हणतात यांच्या ढुंगणावर लाथा मारा. खरं तर खरी लाथ संजय राऊत याच्या ढुंगणावर मारायला हवी. कारण संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यासाठी संजय राऊतच्या ढुंगणावर आधी लाथ मारली पाहिजे; अशा शब्‍दात आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT