संभाजीनगर : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या घरी ते गेले ठीक आहे. मात्र या पूर्वी असे घडले नाही. मातोश्री बाहेर कुणी जात नव्हते; आता जाताय ठीक आहे. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्री बाहेर जाऊन बैठक घेताय हे लोकशाही करता चांगल आहे; अशी खोचक टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Live Marathi News)
चंद्रकांत पाटीलबाबत (Chandrakant Patil) अमित शाह यांचा कुणालाही फोन आला नाही. ना मला आणि ना शेलार यांना. आशिष शेलार दिल्लीला गेले असतील तर त्यांचे काही वेगळं काही काम असेल आणि (BJP) भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला याबाबत काहीही सूचना केली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, आम्ही बांधावर जातोय. फेसबुकवर अवलंबून आम्ही नाही लवकरच मदत मिळेल; असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
ते वरिष्ठ नेते, त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच काढतात
पाटील यांच्या वक्त्याव्यानंतर मी स्वतः बोललो. बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान निर्विवाद आहे. चंद्रकांत पाटील यांचे स्वतःचे मत आहे. मोदींजींच्या नेतृत्वात राम मंदिराचे काम मात्र जोरात सुरु आहे. चंद्रकांत पाटील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेहमीच वेगळा काढल्या जातो म्हणून वाद होत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा हे जर तर आहे, याला अर्थ नाही. कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल. मात्र शिवसेना भाजप युतीची राज्यात सत्ता आहे आणि हेच जनतेचे मत आहे, हाच जनतेचा कौल आहे. तसेच पंकजा मुंडे कुठे लढणार हा निर्णय आम्ही घेत नाही. आमचं संसदीय मंडळ घेत. त्यामुळे याबाबत चर्चा असण्याची गरज नाही. अजित पवार यांचा नाव ईडी अहवालात नाही; तर ही ईडीनेच केलेली चौकशी आहे त्यात जे असेल ते येईल.
नागपूर महाविकास आघाडी सभेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, की महाविकास आघाडीने सभेच्या माध्यमातून अथवा कुठल्याही माध्यमातून त्यांच्या नेत्यांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये. आमच्या नेत्यांवद्दल व्यक्तिगत टीका केली. तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.