Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: खर्चासाठी पैसे नाही, म्हणून फार्मसीच्या विद्यार्थ्याचे कारनामे; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

आई– वडील खर्चासाठी पैसे देत नाही, म्हणून फार्मसीच्या विद्यार्थ्याचे कारनामे; अखेर सापडला पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : आई वडील खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून दुचाकींची चोरी करण्याचा धंदाच फार्मसीच्या विद्यार्थ्याने (Student) सुरू केला. पोलिसांनी त्याच्याकडून आणि त्याच्या मित्राकडून तब्बल २१ लाख ९५ हजार किमतीच्या ३६ दुचाकी हस्तगत केल्या. सहा पोलीस (Police) ठाण्यातील ३७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या मोठ्या कारवाईमुळे दुचाकी चोरणाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. (Maharashtra News)

गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी किंवा स्वतःला आयुष्य आरामात जगता यावे, यासाठी चोरी करण्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. परंतु औरंगाबाद (Aurangabad) येथील एका पट्ट्याने आई- वडील खर्च करायला पैसे देत नसल्याने दुचाकींच्या चोरी (Crime) करण्याचा जणू धंदाच सुरू केला. शैलेश खेडकर असे या फार्मसीच्या विद्यार्थ्याचे नाव असून यामध्ये त्याचा मित्र विजय अळींग याची देखील त्याला साथ लाभली. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल २१ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ३६ दुचाकी जप्त केल्या.

दुचाकी चोरी विरोधातील मोहिमेत आला ताब्‍यात

शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दुचाकी चोरी विरोधात धडक मोहीम हाती घेतली. यातूनच मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी शैलेश खेडकर या फार्मसीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 36 दुचाकी चोरल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर या पठ्याने चोरलेल्या दुचाकी आपल्या शेतात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी हस्तगत केल्या असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एकंदरीतच पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरणाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT