aurangabad  saam tv marathi
महाराष्ट्र

Aurangabad : अवघ्या काही सेंकदात होत्याचं नव्हतं झालं! चेन्नई एक्सप्रेसने ४३ मेंढ्या, २ गायी आणि बैलाला चिरडलं

रेल्वेरुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत 43 मेंढ्या, दोन गायी व एका बैलाचा चिरडून मृत्यू झाल्याची मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Aurangabad News : रेल्वेरुळ ओलांडताना रेल्वेच्या (Railway) धडकेत ४३ मेंढ्या, दोन गायी व एका बैलाचा चिरडून मृत्यू झाल्याची मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील करमाड जवळील सटाणा शिवारातील रेल्वेरुळावर सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंढ्यांच्या कळपास चारून दुपारचे पाणी पाजण्यासाठी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या तलावात पाणी पाजून परतत असताना रूळ ओलांडताना दुर्दैवाने ही घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेससमोर अचानक मेंढ्याचा कळप आल्याने हा अपघात घडला.

काही दिवसांपासून नांदगाव (जिल्हा नाशिक) तालुक्यातील बानगाव टाकळी येथील मेंढपाळांनी सुमारे ३०० मेंढ्या करमाड व सटाणा शिवारात बसवल्या आहेत. सुपरफास्ट रेल्वेच्या धडकेत या मेंढपाळांच्या नजरेसमोर अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडत असतांना हातावर हात ठेवण्यापलिकडे त्यांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यातच घटनेचे फोटो व काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हजारो पावले घटनास्थळाकडे जाताना दिसत होते. दरम्यान, करमाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी येणाऱ्यांना अटकाव केला आणि आलेल्यांना बाजूला सारले. सध्यस्थितीत धडकेत रुळालगत व बाजूला फेकल्या गेलेल्या मेंढ्यांना एकत्रित करण्याचे काम करमाड पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या घटनेने दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन काळातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. दोन वर्षापूर्वी बाहेर राज्यातील मजूर हाताला काम नसल्याने रेल्वे रुळा-रुळाने आपापल्या गावी पायी चालत जात असताना जेवण करून रात्रीच्या वेळी जेवण करून रुळावरच डुलकी लागल्यानंतर सोळा मजूरांचा अशाच पद्धतीने त्यांचा याच घटनास्थळी शेजारी चिरडून मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT