शीना बोरा हत्याकांड : साक्षीदार राहुल मुखर्जीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, इंद्राणी आणि माझं...'

इंद्राणी आणि माझं रक्ताचे नाते नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने संबंध सुरू ठेवले, असा धक्कादायक खुलासा साक्षीदार राहुल मुखर्जीने केला आहे.
Indrani Mukherjea  (file Photo)
Indrani Mukherjea (file Photo)SAAM TV
Published On

सूरज सावंत

Sheena Bora Case : मुंबईतील (Mumbai) हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने नवीन खुलासा केला आहे. इंद्राणीने मुंबई सत्र न्यायालयात नवीन खुलासा केला आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून प्रथमच शीना बोरा इंद्राणीची मुलगी असल्याची कबुली देण्यात आली आहे. तसेच आरोपी राहुल मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे. इंद्राणी आणि माझं रक्ताचे नाते नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने संबंध सुरू ठेवले, असा धक्कादायक खुलासा साक्षीदार राहुल मुखर्जीने केला आहे.

Indrani Mukherjea  (file Photo)
शिवीगाळ केलीच नाही, माझ्या विरोधात खोटा FIR; भुजबळांनी लिहलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून आज, सोमवारी राहुल मुखर्जी याची उलट तपासणी घेतल्यानंतर खुलासा केला आहे. इंद्राणीचे वकील अॅड. रणजीत सांगळे यांनी विचारले की, तुम्ही शीना तुमच्या सावत्र आईची मुलगी, तुझी चुलत बहीण आहे हे माहिती झाल्यानंतर ही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले?

याबाबत नैतिकदृष्ट्या तुला काहीच वाटलं नाही का? यावर साक्षीदार राहुल मुखर्जीने म्हटले की, इंद्राणी आणि माझं रक्ताचे नाते नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने संबंध सुरू ठेवले. मात्र, २०१५ पासून शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचे इंद्राणी मुखर्जीकडून दावा केला जात होता. मात्र, इंद्राणीने स्वत:ची मुलगी असल्याचे कबूल केले.

Indrani Mukherjea  (file Photo)
Pune : चांदणी चौकातील पूल कोणी, किती महिन्यांत बांधला होता?; स्वतः इंजिनीअर मराठेंनी सांगितली सर्व माहिती

दरम्यान, माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. स्वत:ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत होत्या. त्यानंतर इतक्या वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणीला दिलासा देत जामीन (Bail) मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com