Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

दुर्दैवी..बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू

दुर्दैवी..बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना (Aurangabad) औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यातील (Jalgaon) जळगाव मेटे येथे घडली आहे. पोळ्याच्या पूर्व संध्‍येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Aurangabad News Death in Dam)

पंढरीनाथ कचरू काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) असे मृत काका पुतण्याची नावे (Farmer) आहेत. पोळा असल्याने खानबैलीच्‍या दिवशी अर्थात पोळ्याच्‍या आदल्‍या दिवशी बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे पुतण्या रितेश आणि पवन यांना सोबत घेऊन शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले. बैल धुताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. यामुळे ते तलावात पडले.

वाचविण्यासाठी पुतण्याची उडी

काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. परंतु, यात काका व पुतण्याला बाहेर निघता आले नाही. दुर्दैवाने दोघांचाही बुडून (Death) मृत्यू झाला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT