Aurangabad News
Aurangabad News  saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News : भयंकर! मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना उडवलं; थरकाप उडवणारी घटना

साम टिव्ही ब्युरो

Aurangabad Accident News : औरंगाबाद येथे अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत एका जीपचालकाने तीन गाड्यांना उडवलं आहे. घटना घडल्यावर संतप्त जमावाने चालकाला चोप देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ सुरू झाला होता. (Latest Aurangabad News)

औरंगाबाद शहरातील सिडको चौकात हा विचित्र अपघात घडला आहे. एका मद्यधुंद जीपचालकाने (स्कॉर्पिओ) भरधाव वेगात येत सिग्नलवर उभे असलेल्या तीन महागड्या कारला जोरदार धडक दिली. रविवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात स्कॉर्पिओच्या धडकेत सिग्नलमध्ये थांबलेल्या एकासमोर एक अशा दोन कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. यात एका फॉरच्यून कारचा देखील समावेश आहे. तर करण झीने असे या मद्यधुंद जीपचालकाचे नाव आहे.

बदलापूरमध्ये देखील काल रविवारी रात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट एका घरावर धडकली. यात कारसोबत घराचंही नुकसान झालं. हेंद्रेपाडा परिसरात रात्री ११ च्या सुमारास झालेल्या या अपघातात एका घराचं नुकसान झालं.

तसेच कारमधील चालक चंद्रभान वर्मा आणि गौरव वर्मा हे किरकोळ जखमी झालेत. अपघातानंतर चंद्रभान वर्मा पळून गेला, तर गौरव वर्मा याला पोलिसांमी ताब्यात घेतलं. दारू पिऊन बेदरकारपणे कार चालवून अपघात केल्याप्रकरणी या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT