Jayakwadi Dam Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad : जायकवाडी धरणाच्या पाण्यावर फेस आणि तवंग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विशेष म्हणजे औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याच ठिकाणाहून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) जायकवाडी धरणाच्या पाण्यावर फेस आणि तवंग आल्यानं खळबळ उडालीय. पाटबंधारे विभागाकडून आता या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. मात्र, केमिकलमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले सोडल्याचा परिणाम असल्याचे सांगितले जातंय. (Aurangabad Latest News)

जायकवाडीमध्ये पाण्याची आवक थांबल्यानंतर एक ते दोन महिन्यांत पाण्यावर हिरवा तवंग तरंगताना दिसतो, हा तवंग शेवाळ वनस्पतीचा असतो. मात्र, आता औरंगाबाद आणि जालना पंप हाऊस लगतच्या पाण्यावर मागील तीन दिवसांपासून फेस आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे औरंगाबादसह (Aurangabad) जालना (Jalna) जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याच ठिकाणाहून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे. आतापर्यंत पूर्णपणे शुद्ध दिसणारे धरणाच्या पाण्याचा रंग या आठ दिवसात बदलला आहे. मात्र, या तीन दिवसांपासून औरंगाबाद पंप हाऊस आणि जालना पंप हाऊस या ठिकाणच्या पाण्यावर फेस आल्याचे दिसत आहे.

ज्या ठिकाणाहून औरंगाबाद व जालना शहरासह पैठणला पाणीपुरवठा होतो. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्यावर फेस येत आहे, या संदर्भात स्थानिक कामगारांना विचारले असता, धरणात सोडण्यात येत असलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे धरणाचे पाणी दूषित झाले असावे, या अगोदर पाणी हिरवे होते. मात्र, या दोन दिवसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस येत असल्याची माहिती आनंद हिवराळे यांनी दिली. दरम्यान, नदीपात्रात केमिकल सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT