Aurangabad Crime
Aurangabad Crime नवनीत तापडिया
महाराष्ट्र

भंडाऱ्यानंतर आता औरंगाबाद हादरले, गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपुर्वी संपुर्ण राज्याला हादरविणाऱ्या भंडारा (Bhandara) बलात्कार प्रकरणानंतर आता औरंगाबादमध्ये(Aurangabad) महिलेला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला, शिवाय लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओ (Video) शुटींग करुन तो व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत लग्नाला नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे.

पाहा व्हिडीओ -

सय्यद नबी सय्यद लाला वय वर्ष ३५ राहणार जोगेश्वरी आंबेडकरनगर असे पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यदने पीडित महिलेला गुंगीचे औषध देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावेळी त्यांने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतांनाचे व्हीडीओ शुटींग केलं. शिवाय ते शुटींग व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासही नकार दिला. ही घटना औरंगाबादमधील वाळूज MIDC परिसरात उघडकीस आली आहे.

पीडितेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार ९ ऑगस्ट २०१७ ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशकात शांतीगिरी महाराज शिंदेंचे उमेदवार? महाराजांच्या दाव्यामुळे शिंदे गटात खळबळ

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

SCROLL FOR NEXT