Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

वडिलांनी मारहाण केली म्हणून १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर; लग्नाचीही घातली गळ पण...

वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून एका १४ वर्षीय मुलीने घरातून पळ काढला.

Jagdish Patil

नवनीत तापडिया -

औरंगाबाद: घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या (Mukundwadi Police Station) हद्दीत घडली आहे. आजकाल अनेक मुलामुलींचं एकमेकांवर अगदी शाळेत असल्यापासून प्रेम असल्याचं आपण पाहिलं असेल.

शिवाय अल्पवयीन मुलं देखील आपल्या प्रेयसीला घेऊन पळून लग्न केल्याच्या घटना देखील अनेक वेळा घडतात. शिवाय घरचेच मुलांना अयोग्य वागणूक देत असतील आणि त्यांचा छळ करीत असतील तर ती मुलं आपल्या प्रियकरावरती असलेल्या विश्वासामुळे घरच्यांना सोडण्याचा निर्णय घेत असतात.

असाच एक प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडला आहे. वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून एका १४ वर्षीय मुलीने घरातून पळ काढला आणि प्रियकराचं घर गाठलं. परंतु मुलीच्या आई-वडीला पोलिस ठाण्यात गेल्याचे समजतात प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांसमोर हजर केलं.

पाहा व्हिडीओ -

मात्र, त्यानंतर मुलीने वडिलांच्या घरी न जाता तीने बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मुलींनी घर सोडून प्रियकराच्या घरी जाण्याचा मार्ग निवडते म्हणजे तिला घरी नक्कीच त्रास दिली जात असेल असं परिसारातील लोक म्हणत आहेत. तर आपल्या मुलांना योग्य वागणूक द्या म्हणजे ते टोकाचं पाऊल उचलणार नाहीत. घर सोडून जाणार नाहीत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

SCROLL FOR NEXT