Aurangabad Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद महानगरपालिकेचं नवं पाऊल; अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी बायोमास विटांचा वापर

या विटा शेतातील तुराटी, कापसाच्या पलाट्या, सोयाबीनचे काड, गव्हाचे काड, हरभराचे काड, सोयाबीनचा पाला यापासून बनविल्या जातात.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - पर्यावरण संवर्धनासाठी औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेने एक नवीन पाऊल टाकलं आहे. शहरातील २६ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आता लाकडाऐवजी बायोमास विटांचा वापर केला जाणार आहे. सगळीकडे अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केला जात असल्याने वृक्षतोडीसोबतच पर्यावरण (Environment) प्रदूषणाचा प्रश्न हळूहळू चर्चेला येत आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) त्यावर एक उपाय शोधून एक नवं पाऊल टाकलं आहे.

हे देखील पहा -

औरंगाबाद शहरातील २६ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पुढच्या काळात लाकडाऐवजी शेतीच्या वेस्टपासून तयार केलेल्या बायोमास विटांचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे. स्मशानभूमींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास चार क्विटल लाकडाची गरज असते. त्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते.

लाकडाचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पर्यायी वस्तूंचा वापर करण्याचा ठराव डिसेंबर महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार आता शेतमालातील वेस्टपासून बनवलेल्या विटांचा वापर करण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेने पर्यावरण रक्षणासाठी जरी लाकडाला पर्यायी वस्तू वापरण्याचा निर्णय घेतला असला तरी नागरिकांकडून त्याला प्रतिसाद कसा मिळतो, हे पहावं लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT