औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून
औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून SaamTV
महाराष्ट्र

औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील मिसारवाडी (Misarwadi) भागामध्ये 25 वर्षीय युवकाचा ९ जणांनी चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील वर्षांमध्ये 31 खून शहरांमध्ये (City) झाले होते. तर या खुनाने या वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा (Law) आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हसन साजिद पटेल असे मृताचे नाव आहे.

हे देखील पहा-

सिडको पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडी येथे मध्यरात्री हसन पटेल याचा जुन्या वादातून ९ जणांनी खून केल्याचे उघडकीस झाले आहे. मृताचा भाऊ जावेद पटेल यांच्या तक्रारीवरून सिडको (CIDCO) पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत हसन पटेल हा प्लॉट खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होता. संध्याकाळी ९ वाजेच्या सुमारास तो घराबाहेर पडला. रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान, मिसारवाडीतील एका टपरीजवळ त्याच्यावर ९ जणांनी अचानक चाकूने हल्ला केला होता.

या प्रकरणातील मुख्य आरोपी तालेब चाऊस याने मृत हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दीपक गीते उज्वला वनकर सहाय्यक आयुक्त शशीकांत पवार पोलीस निरीक्षक संभाजी पवार ड्युटी ऑफिसर उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water in Summer : 'या' ५ पद्धतीने नारळ पाणी प्या आणि तंदुरुस्त राहा; शरिरातील उष्णता चुटकीसरशी होईल गायब

Sanjay Pandey News : माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंची निवडणुकीतून माघार, गायकवाड आणि निकमांना दिल्या शुभेच्छा

Sanjay Raut: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसेना नेहमीच पुढे; संजय राऊतांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Today's Marathi News Live : महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर अखेरच्या दिवशी अर्ज भरणार

Mumbai Local News | मुंबईत लोकलमधून पडून 139 जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT