Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: धक्कादायक! गर्भपातासाठी पत्नीला खाऊ घातल्या गरजेपेक्षा जास्त गोळ्या; महिलेचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपात करण्यासाठी पतीने गरजेपेक्षा जास्ती गोळ्या पत्नीला खाऊ घातल्याची घटना घडली आहे. गरजेपेक्षा जास्तीच्या गोळ्या खाल्याने रक्तस्त्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी महिलेच्या पतीविरोधात फुलंब्री पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. दरम्यान महिलेला चौथे अपत्य होणार होते. चौथे अपत्य होऊ नयेत म्हणून पतीने पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. पण त्या किती खाव्यात याबाबत माहिती नसलेल्या पतीने पत्नीला आवश्यकतेपेक्षा जास्त गोळ्या खाऊ घातल्या. (Aurangabad Crime News)

एकाचवेळी जास्त गोळ्या खाल्याने महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला आणि प्रकृती बिघडली. त्यामुळे महिलेला उपचारासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल मात्र तेथून त्यांना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकरणी महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भावाच्या तक्रारीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी पतीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Sahil Khan News | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

Health Tips: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 'या' फळांचे करा सेवन

SCROLL FOR NEXT