Aurangabad, road closed
Aurangabad, road closed saam tv
महाराष्ट्र

Aurangabad : आजपासून औरंगाबाद - जळगाव मुख्यरस्ता तीन दिवस बंद; जाणून घ्या कारण

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : औरंगाबाद (Aurangabad) जळगाव (jalgoan) मुख्यरस्ता आजपासून (साेमवार, ता. 13) तीन दिवस बंद राहणार आहे. शहरातील हर्सुल गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. (Aurangabad Latest Marathi News)

मागील बऱ्याच दिवसापासून हर्सुल गाव येथील अतिक्रमणाचा विषय औरंगाबादमध्ये ऐरणीचा बनला होता. मात्र आता हे अतिक्रमण (encroachment) काढले जाणार आहे. तर नागरिकांनी (citizens) देखील स्वतःहून आपले दुकान खाली करणे सुरू केले आहे.

हा रस्ता बंद असल्याने पोलिसांकडून (police) पर्यायी रस्ता सुचवण्यात आला आहे. मात्र यामुळे नागरिकांना तब्बल दहा किलोमीटर औरंगाबादला फेरा मारावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना इंधनाचा आर्थिक भार साेसावा लागणार आहे.

हर्सूल मार्गे सावंगी-फुलंब्री- सिल्लोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा रस्ता बंद.

पर्यायी मार्ग

औरंगाबादमधून फुलंब्री, सिल्लोडकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉइंटवरुन वळवून आंबेडकरनगर चौक-पिसादेवी बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.

फुलंब्री-सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका इथून सावंगी बायपास मार्गे नारेगाव-वोखार्ड टी पॉईंट अशी वळवली आहे.

गरजेनुसार बदल केले जातील. तरी नागरिकांनी औरंगाबाद जळगाव हा मुख्य रस्ता आजपासून 16 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live: प. बंगालमध्ये उच्चांकी ७३ टक्के मतदान, महाराष्ट्रात फक्त ४८.६६ टक्के

Devendra Fadnavis: सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस

Weightloss Tips: एका आठवड्यात किती किलो वजन कमी करावे?

Maharashtra Rain News : वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; कोल्हापुरात कारवर कोसळलं भलं मोठं झाड, कारचा झाला चुराडा

Ruchira Jadhav: सुपर हॉट रुचिरा; कहर लूकने उडवली झोप!

SCROLL FOR NEXT