Divya dande
Divya dande Saam Tv
महाराष्ट्र

दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गोदापात्रात सापडला

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचा अखेर मृतदेहच पोलिसांना सापडला आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील एक तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार गंगापूर पोलिसांत (Police) नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस या तरुणीच्या शोधात होते. रविवारी अखेर तिचा मृतदेह पोलिसांना जुने कायगाव टोका येथील गोदावरी नदीपात्रात आढळून आला. (Aurangabad Latest Marathi News)

दिव्या अनिल दंडे (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या ही 09 जूनपासून घरातून बेपत्ता होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता. दरम्यान, रविवारी सकाळी तिचा मृतदेह औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुना कायगाव टोका येथील गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दिव्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. नातेवाईकांच्या परवानगीने पोलिसांनी डॉक्टरांमार्फत तिचे शवविल्छेदन केले. दरम्यान, दिव्याने आत्महत्या केली की, तिच्यासोबत घातपात झाला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या तरी या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT