Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

Maharashtra politician reaction on sharad pawar statement :शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?
Maharashtra Politics : Saam tv
Published On

मुंबई : शरद पवार यांनी आगामी काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल,असं भाकित केलं. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी बोलताना शरद पवारांनी हे मोठं विधान केलं. शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर सर्वच प्रादेशिक पक्ष विलीनीकरण होणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शरद पवारांच्या विधानावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ते त्यांचं जेनेरिक स्टेटमेंट आहे. सर्वच प्रादेशिक पक्ष विलीन होणार नाहीत. त्यांनी अनेक प्रादेशिक पक्ष म्हटलं आहे, म्हणजे कोणीही असू शकतो. याचं उत्तर शरद पवारच देऊ शकतील'.

शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी - राऊत

शरद पवारांच्या प्रादेशिक पक्षाविषयीच्या प्रश्नावर खासदार संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रीय आहे. प्रादेशिक पक्षांची एक प्रांतीय अस्मिता आहे. ते पक्ष आपल्या अस्मितेसाठी पक्ष स्थापन करून स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पक्षाचा राज्यात पराभव झाल्याचं उदाहरण आहे'.

'शिवसेना हे एका पक्षात विलीन होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणीबाणीमध्ये शिवसेना पक्ष भक्कम उभा राहिला. काँग्रेसमध्ये विलीन केला नाही. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतायेत का, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आम्ही एकत्र आहोत. मात्र, पक्षाचे विचार भिन्न आहेत, राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?
Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न - अजित पवार

शरद पवारांच्या विधानावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'ते शरद पवार यांचे वैयक्तिक विधान असेल. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाबद्दल काय विचार करावा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे'.

...म्हणून निर्णय घेतला असेल - देवेद्र फडणवीस

शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' त्यांना पक्ष पुढे चालवता येणे शक्य नसल्यामुळे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असेल. शरद पवारांनी कित्येक वेळा पक्ष तयार केला आणि काँग्रेसमध्ये विलीन केला आहे'.

आता औपचारिकता बाकी आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शरद पवारांच्या विधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'शरद पवार काही सूचक वक्तव्य करत असतात. आता औपचारिकता बाकी आहे'.

ठाकरे गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार - शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे

शरद पवारांच्या विधानावर मनीषा कायंदे म्हणाल्या की, २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शरद पवार यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. याच न्यायाने संजय राऊत काही दिवसातच एखाद्या सकाळी भांडुपमधून ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे, अशी घोषणा करतील, अशी आम्हाला खात्री आहे'.

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?
Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार म्हणाले होते की, आम्ही वैचारिकदृष्ट्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फारसा फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com