Aurangabad Crime  Saam TV
महाराष्ट्र

औरंगाबाद हादरलं! निर्जनस्थळी कारमध्ये स्फोट; जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेत आढळले मृतदेह

औरंगाबाद मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद मधून (Aurangabad ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरामधील (city) गंधेली परिसर येथे एका कारमध्ये (car) भीषण स्फोट (explosion) झाला आहे. या स्फोटामध्ये एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, शहरामधील गंधेली परिसरात काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. (aurangabad explosion in a car naked bodies of a couple found incident)

हे देखील पहा-

गंधेली परिसरातील निर्जनस्थळी एका कार थांबवली होती. पण अचानक काही वेळानंतर या कारमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये कारमधील एका महिलेचा आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, महिला आणि पुरुषाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या स्फोटामध्ये कारचा आत मधील भाग जळाला आहे. या कारचा स्फोट कशामुळे झाला आहे, अद्याप आजून देखील समजू शकले नाही.

निर्जनस्थळी उभी असलेली ही कार एका शेतकऱ्याच्या (farmer) निदर्शनास आली. त्याने जवळ जावून पाहणी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण (Rural) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. स्फोट कशामुळे झाला याचा चिकलठाणा ग्रामीण पोलीस तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT