Aurangabad Waluj Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये तुंबळ हाणामारी; ७ जणांविरोधात गुन्हा

नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चौघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अंगावर काटा आणणारी ही घटना औरंगाबादजवळील (Aurangabad) वाळूज एमआयडीसीमध्ये घडली. हाणामारीनंतर परस्परविरोधी तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad Latest Crime News)

सविस्तर वृत्त असे की, वाळूज एमआयडीसीमधील रांजणगावात प्रभाकर चोरमले हे कुटुंबासह इस्लाम बेग यांच्या घरात किरायाने राहतात. बेग यांच्या दुसऱ्या खोलीत भाऊसाहेव दळवी आणि त्यांचे कुटुंब किरायाने राहतात. त्या दोघांमध्ये नळाचे पाणी भरण्यावरून वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी दोन्ही घरांतील महिलांचा वाद झाला. या वादानंतर रात्री भाऊसाहेब, योगेश आणि महेश दळवी या तिघांनी चोरमले यांच्या घरी जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

दरम्यान, आपल्या आईला शिवीगाळ केली जात असल्याने संकेत हा समजावण्यासाठी घराबाहेर आला. तेवढ्यात योगेशने संकेतवर चाकूने वार केले. संकेतने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्याचे आई-वडील आले. योगेशने प्रभाकर यांच्यावर चाकूने दोन तर चोरमले बाईंवर एक वार करून दगड मारून या दोघांनाही जखमी केले. भाऊसाहेबने चाकूने नितीनवर वार केले.

या प्रकरणाची माहिती मिळातच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी चार जणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, संकेत चोरमले याने भाऊसाहेब, योगेश, महेश व दळवीबाई यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तर भाऊसाहेब दळवी यांनीही प्रभाकर चोरमले, संकेत चोरमले व नितीन चोरमले यांनी आपल्याला व कुटुंबीयांना मारहाण केल्याची तक्रार दिली. यावरून दोन्ही कुटुंबांतील ७ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT