Aurangabad Gangapur Crime Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Crime : वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण; व्हिडीओही बनवले, गंगापूर तालुक्यातील संतापजनक घटना

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना व्हिडीओ देखील बनवण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला गंगापूर फाट्यावर (Aurangabad) असलेल्या पारधी वस्तीवर आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी या वृद्ध महिलेला गंगापूर फाट्यावरून आपल्या घरी म्हणजेच ओझर वस्तीवर नेले. तिथे आरोपींनी महिलेला विवस्त्र करत बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपी महिलेला मारत होते. तेव्हा त्यांचे इतर साथीदार या घटनेचा व्हिडीओ बनवत होते.

यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. दरम्यान, आरोपींची एवढी मजल गेली की त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT