Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: अत्यंत वेदनादायी! निर्दयी आई-वडिलांनी नवजात अर्भकाला पोत्यात भरून उसाच्या शेतात सोडलं

Sambhajinagar Crime News: अत्यंत वेदनादायी! निर्दयी आई-वडिलांनी नवजात अर्भकाला पोत्यात भरून उसाच्या शेतात सोडलं

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Crime News:

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकलेहरा यथील उसाच्या शेतात नवजात पुरूष जातीचे अर्भक जखमी अवस्थेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आले. पोलिसांनी नवजात आर्भकाला सुरक्षितपणे बजाजनगर येथील आष्टविनायक रुग्णालयात दाखल केले.

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एकलेहारा येथील अनिल शिंदे यांच्या मालकीच्या शेतामध्ये नवजात अर्भक रडत असल्याचा आवाज शेजारील शेतात काम करणाऱ्या रुक्मणबाई गांगरडे याना आला. त्या तत्काळ ही माहिती अनिल यास दिली. अनिलने पुढे होऊन पाहणी केली असता, एका सिमेंटच्या टाकाऊ गोणीच्या पोत्यावर नुकतेच जन्मलेले अर्भक त्यांना दिसले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनिल यांनी तत्काळ ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसाना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला पोलीस व्हॅनमध्ये बजाजनगर येथील रुग्णालयात दाखल केलं.  (Latest Marathi News)

पोलीस बनले पालक

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाच्या गळ्यावर, पायावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर किरकोळ जखमा असल्याचे आढळून आले. पुढे डॉक्टरांच्या सांगण्यावरून फौजदार शिंदे यांनी बाळासाठी दोन जोडे ड्रेस, पांघरून, दूध आणि औषधी खरेदी केली. तर, महिला कर्मचारी संगीता वैद्य यांनी बाळाला मायेने कुशीत घेऊन दूध पाजले. नुकतेच जन्माला आलेले अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हापासून भुकेमुळे व्याकूळ होऊन रडत होते. महिला पोलीस कर्मचाऱ्याने जवळ घेऊन दूध पाजताच बाळ शांत झाले. वर्दीच्या आतील माणुसकी पाहून रुग्णालयातील नागरिक आवक होऊन बघत होते.

पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना ज्या ठिकाणी बाळ आढळून आले, त्या ठिकाणापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर नांदेडा येकलहरा मार्गावर रस्त्यात रक्त सांडल्याचे आढळून आले. त्यावरूनच पोलिसांनी सदरील माता या ठिकाणी प्रसूत झाली असावी, असा अंदाज वर्तविला. तुर्तास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असणून त्यानंतर गुन्हा दाखल करुन आर्भकाला टाकून देणाऱ्या निर्दयी आई-वडिलांचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

SCROLL FOR NEXT