Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! नशेत पाण्याच्या टाकीवर चढणे भवले, खाली पडल्याने गेला जीव

औरंगाबाद येथील धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात (village) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचा खाली पडून जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश रामकिसन मोडे (वय- ३५ रा.तोंडोळी, ह.मु. वांबोरी ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या मृत व्यक्तीचा मृतदेह उत्तर तपासणीकरिता बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयामध्ये (hospital) हलविण्यात आला आहे. तर या घटनेची परिसरात जोरदार चर्चा बघायला मिळत आहे.

हे देखील पाहा-

या प्रकरणाविषयी पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, मूळ तोंडोळी गावाचे रहिवासी सुरेश मोडे मागील काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने गाव सोडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यात वास्तवास होते. पण गावात (village) पुतणीच लग्न असल्याने ते गावाकडे आले होते. दरम्यान बुधवारी सुरेश हे रात्री दारू पिऊन झोपायला गेले असता उकाडा जाणवत असल्याने ते गावातील पाण्याच्या टाकीवर (Water tank) झोपायला गेले होते. परंतु, पाण्याच्या टाकीवर गेल्यावर दारूच्या नशेत असेलल्या सुरेश यांचा तोल गेला आणि ते जोरात खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे आणि मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश हे रात्री ११ वाजेच्या दरम्यान झोपण्याकरिता पाण्याच्या टाकीवर गेले होते. यावेळी त्यांचा तोल गेल्याने अगोदर ते पाण्याच्या टाकीच्या खालच्या मजल्यावर पडले. यावेळी त्यांच्या डोके सिमेटच्या कठड्यावर जोरात आदळले. त्यानंतर ते खाली पडले. रात्री घडलेली हि घटना सकाळी गावात काही लोकांच्या लक्षात आली. यानंतर सुरेश यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते.

मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते. तोंडळी येथे राहणाऱ्या मोडे कुटुंबात २१ तारखेला लग्न होणार आहे. तर आपल्या पुतणीचे लग्न असल्याने सुरेश हे बुधवारी गावाकडे आले होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. तर अनेक पाहुणे मंडळी आल्याने मोडे कुटुंबात उत्सहाचे वातावरण होते. मात्र, या घटनेमुळे मोडे कुटुंबावर मोठं दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT