Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: 30:30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोडच्या तीन डायरी पोलिसांच्या हाती, अनेकांचे धाबे दणाणले

संतोष राठोडला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्या नातेवाईकाकडून हिशोबाच्या तीन डायरी पोलिसांना सापडल्यात.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील 30:30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोडला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्या नातेवाईकाकडून हिशोबाच्या तीन डायरी पोलिसांना सापडल्यात. त्या डायऱ्यांमध्ये या घोटाळ्याच्या नोंदी आहेत. या डायरीमुळे आता अनेकांचे धाबे दणाणलेत (Aurangabad 30:30 Scam Mastermind Santosh Rathores Three Diaries Confiscated By Police).

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यातल्या बिडकीन पोलिसांनी अटक केलेल्या या संतोष राठोडच्या काळ्या कारनाम्याची डायरी पोलिसांच्या हाताला लागलीये. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवणाऱ्या 30-30 घोटाळ्यातील (Scam) नोंदी या डायरीत आहेत. शिवाय, अनेकांची नावं, वेगवेगळ्या व्यवहाराच्या नोंदी असल्यानं या घोटाळ्यात अडकलेले आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

2013 पासून संतोष राठोडने (Santosh Rathod) 30:30 ही योजना सुरु केली. 2019 ते 2021 दरम्यान त्याची वेगाने वसुली सुरु होती. एकाचे घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे, असा सपाटा सुरू होता. 21 जानेवारीला दौलत राठोड यांच्या तक्रारीवरुन बिडकीन ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची डायरी शोधली. ज्यात गुंतवणूकदारांची नावे, रक्कम, परताव्याची टक्केवारी आणि दिनांक अशी नोंद पेन्सिलीने केलेली आहे.

या 30-30 घोटाळ्यात राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, शेतकऱ्यांची नावेही आहेत. त्यात पोलीस खोलवर जाऊन तपास करतायत. या घोटाळ्यात संतोष राठोडचे अनेक साथीदार असल्याचं दिसून येतय. त्यामुळे या घोटाळ्याच्या साखळीत लुटेरे असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT