Nagpur Hit and Run Nagpur Hit and Run
महाराष्ट्र

Nagpur Hit and Run : भाजपच्या नेत्याच्या मुलाच्या ऑडीने ३ वाहनांना उडवले, २ जणांना ठोकल्या बेड्या!

Nagpur Accident : अपघातानंतर कारचालक फरार झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही महागडी ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे.

Namdeo Kumbhar

नागपूरमध्ये एका महागड्या ऑडी कारचालकाने तीन वाहनांना उडविल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडे बाराच्या वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन जितेंद्र हावरे (वय २४, रा. खामला) आणि रोनित चिंतमवार (वय २७, रा. मनीषनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा महागडी ऑडी कार चालवीत होता. त्याच्या बाजूला रोनित बसला होता. दोघेही रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडने जात असताना वेगामुळे अर्जुनचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावर असलेल्या दोन कारला धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीला उडविले.

अपघातानंतर कारचालक फरार झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही महागडी ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे. घटनेच्या वेळी संकेतचा मित्र अर्जुन गाडी चालवत होता. दरम्यान, ऑडी कारमध्ये राज्यातील दिग्गज भाजप नेत्याचा मुलगा असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तसा आरोपही केला आहे. पण पोलिसांकडून अद्याप याला दुजोरा नाही. अपघातग्रस्त ऑडी कार पोलिसांनी जप्त केली आहे.

सुषमा अंधारेंचा आरोप काय ?

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?

माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी संबंधित असो किंवा आणखी कुणी असो.
चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT