स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट मंगेश कचरे
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट

टोकियोत पार पडलेल्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राचं आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून अभिनंदन देखील करण्यात आलं आहे.

मंगेश कचरे, साम टीव्ही, जुजेरी

जेजुरी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.

कोरोनामुळे मंदिरे बंद असली तरी नित्य पूजा पाठ सुरू आहेत. आज देवस्थानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली. खंडोबा मंदीरातील गाभा-यात हंगामाप्रमाणे फुलांची, द्राक्षाची, आंब्याची, दवण्याची, दिवाळीच्या फराळाची, भंडा-याची अशी वेगवेगळी सजावट गाभा-यात केली जाते.

हे देखील पहा -

सध्या खंडोबा मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी नित्य नियमाच्या पुजा सध्या सुरु आहेत.त्रिकाळ नित्य पुजा पुजारी सेवक वर्गाकडून परंपरेनुसार केल्या जात आहेत. याबरोबरच टोकियोत पार पडलेल्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राचं आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून अभिनंदन देखील करण्यात आलं आहे.

ही रांगोळी मंदिराच्या प्रांगणात काढण्यात आली आहे. त्यामध्ये नीरज चोप्राचा भालाफेक व त्याची हुबेहूब अशी चित्रकृती रांगोळी साकारून त्यास मल्हारी मार्तंड देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारत मातेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल नीरज चोप्रा यांचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हार्दिक अभिनंदन केल्याचे श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त पंकज निकुडे यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूरनंतर वांगणी जवळच्या कराव गावात बिबट्याची दहशत

Pune Police: आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

Telangana Accident: महाराष्ट्रातील मजुरांचा तेलंगानामध्ये भयंकर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT