Attempted Human sacrifice narbali of daughter by father in yavatmal Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! बापाकडूनच पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; ११ जणांना अटक

Yavatmal Narbali News : तिने लगेचच यवतमाळ येथील मित्राला भ्रमणध्वनीद्वारे खोदलेल्या खड्ड्याचा फोटो पाठवला.

साम टिव्ही

यवतमाळ: अंधश्रद्धेचं भूत अजूनही मानगटीवरून उतरायचं नाव घेत नाही. गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्यासाठी उताविळ झालेल्या बापाचे पितळ घटनास्थळी वेळेवर पोहचलेल्या पोलीसांमुळे उघडे पडले आहे. बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे गुप्तधनासाठी नरबळीचा (Human sacrifice) प्रयत्न काल रात्रीच्या सुमारास फसला आहे. ह्यात सहभागी मांत्रिकासह नऊ जणांना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempted Human sacrifice Narbali of daughter by father in yavatmal)

हे देखील पाहा -

बाभूळगाव (Yavatmal) तालुक्यातील मादणी येथील रहिवासी सद्या औरंगाबाद येथे बी. फार्मसीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेली मुलगी कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या राहत्या घरी आली. गुप्तधनासाठी राक्षसी वृत्तीचा बाप आपल्या आठ साथीदारांना बोलावून पोटच्या मुलीचा बळी देण्याच्या प्रयत्नात होता. गुप्तधन प्राप्तीसाठी मांत्रिकाची क्रिया सुरू असतांना सदर मुलीला आपला बळी जातोय हे लक्षात आले. तिने लगेचच यवतमाळ येथील मित्राला भ्रमणध्वनीद्वारे खोदलेल्या खड्ड्याचा फोटो पाठवला. सदरची माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस पोहचल्यावर गुप्तधनाची क्रिया सुरू होती.

यात सहभागी वडील आणि मांत्रिक आणि नऊ जणांना साहित्यासह घटनास्थळावरून पोलीसांनी अटक (Arrested) केली. यात वडील राजकुमार जयवंत धकाते, मांत्रिक वाल्मिक रमेश वानखेडे, विजय शेषरावजी बावणे, रमेश कवडूजी गुडेकार, विनोद नारायण चुनारकर, दिपक मनोहरराव श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार, माधुरी विजय ठाकूर, माया प्रकाश संगमनेरकर या संशयीत आरोपीचा समावेश आहे. दरम्यान घटनास्थळी यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली असून पुढील तपास बाभूळगाव येथील पोलीस करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT