अतिक्रमण हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला; अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार Saam TV
महाराष्ट्र

अतिक्रमण हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला; अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार

पोलीस (Police) व वनविभागाच्या लाठी चार्ज दरम्यान 50 पेक्षा अधिक गावकरी देखील जखमी झाले आहेत

संदिप नागरे

हिंगोली : हिंगोलीत शेतकऱ्यांनी वनविभागाच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीच्या (Hingoli) पातोंडा गावातील शिवारात हा प्रकार घडला असून या घटनेत वन विभागाचे दोन अधिकारी व नऊ कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार करत गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे.

पोलीस (Police) व वनविभागाच्या लाठी चार्ज दरम्यान 50 पेक्षा अधिक गावकरी देखील जखमी झाले आहेत तर एका शेतकऱ्याने अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध करत घटनास्थळावर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्या वर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी बासंबा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पातोंडा गावात पोलीस दंगा नियंत्रण पथक व पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT