धक्कादायक! जळगावात वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्यावर ग्राहकाकडून हल्ला Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! जळगावात वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्यावर ग्राहकाकडून हल्ला

जळगावातील सिंधी कॉलनीमध्ये वीज बिलाच्या वसुलीकरिता गेलेल्या महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : जळगावातील सिंधी कॉलनीमध्ये वीज बिलाच्या वसुलीकरिता गेलेल्या महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्‍यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील (Sindhi Colony) टिकमराम परमानंद पोपटानी यांनी ७५ दिवसांपासून वीजबिल (Electricity bill) भरले नव्हते. या वीज बिलाच्या वसुलीकरिता गुरुवारी महावितरण (MSEDCL) कंपनीचे सहाय्यक अभियंता जयेश तिवारी सिंधी काॅलनीत गेले होते. त्यांनी पोपटानी यांना वीजबिल भरण्यास सांगितले. याचा राग आल्यामुळे पोपटानी यांनी घरातून चक्क खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टीकाव आणला आणि शिवीगाळ करत तिवारी यांच्या डोक्यात टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा-

तिवारी यांच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे. त्यांनी पोपटानी यांना बाजूला केले. मात्र, तरी देखील पोपटानी यांनी मारहाणीचा (beating) प्रयत्न केला आहे. या प्रकरणी अभियंता तिवारी यांच्या तक्रारीवरून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित टिकमराम पोपटानी याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. अभियंत्यासोबत असलेल्या कर्मचार्‍यांनी संबंधित घटनेचे मोबाइलमध्ये व्हिडिओ केला आहे.

त्यामध्ये पोपटानी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. शिवीगाळ, आरडाओरड करत गोंधळ घालताना दिसत आहे. या घटनेने वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वीज बिलाच्या वसुलीकरिता एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सक्ती तर दुसरीकडे तर अशा पद्धतीने ग्राहकांकडून जीवघेणे हल्ले होत असतील तर काम कसे करायचे, असा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT